मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे तीन दिवसीय मुला मुलींचे संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबीराच्या पहिल्या दिवशी ५ तारखेला सर्वप्रथम वंदना घेऊन प्रशिक्षणार्थींची ओळख करून देण्यात आली . तिन्ही दिवस संपूर्ण वंदना,आनापान सत्र, महापुरुषांच्या जीवन कार्याची माहिती, अबॅकस ट्रेनिंग(सक्सेस अकॅडमी,रिना मेश्राम),इनडोअर गेम्स, कराटे प्रशिक्षण घेण्यात आले.शेवटच्या दीवशी बुद्ध धम्मावर आधारित प्रश्न मंजुषा,भोजन दान व सर्व प्रशिक्षणार्थींना गिफ्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.शिबीराकरीता समिती च्या अध्यक्ष ममता जांभूळकर, सचिव श्यामला राऊत, उपाध्यक्ष रत्नमाला बडोले व यशोदा मेश्राम, कोषाध्यक्ष कविता मेश्राम तसेच सदस्य गण सरीता बारसागडे, डॉ वंदना घोंगडे,सुनीता नंदागवळी, प्रतिभा बडोले, लीना पाटील, प्रतिमा शेंडे,जीजा सहारे पौर्णिमा बोरकर यांनी परिश्रम घेतले.
