━━
बहुजन समाज पार्टी – बल्लारपूर विधानसभा
पुनर्गठन बैठक उत्साहात संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
━━━━━━━━━━━━━━━━━━
दि. ८ मे २०२६ रोजी PWD गेस्ट हाऊस, मुल येथे बहुजन समाज पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची पुनर्गठन बैठक मा. रत्नाकरजी साठे साहेब (जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर) यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या बैठकीस मा. धर्मेशजी निकोसे साहेब (लोकसभा प्रभारी), मा. प्रा. डॉ. विश्वनाथजी लाडे साहेब (जिल्हा उपाध्यक्ष), तसेच मा. प्रा. राजेशजी ब्राम्हणे सर (जिल्हा प्रभारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक विचार मांडत पक्षवाढीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर सर्वसंमतीने बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
* बल्लारपूर विधानसभा कार्यकारिणी*
विधानसभा अध्यक्ष — मा. मनोजजी जांभुळे
उपाध्यक्ष — मा. मिथुनजी निमसटकर
महासचिव — मा. डॉ. वैशिष्ट्यजी वाळके
प्रभारी — मा. ओमप्रकाशजी दांरुडे
प्रभारी — मा. मनोजजी देवगडे
* मुल शहर कार्यकारिणी*
शहर अध्यक्ष — मा. नरेशजी शेंडे
महासचिव — मा. बंडुजी गेडाम
उपाध्यक्ष — मा. पुरुषोत्तमजी निमगडे
सचिव — मा. सत्यवानजी मोहुर्ले
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा कमिटी व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करून मानवतावादी महापुरुषांच्या विचारांची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी निष्ठेने व जोमाने कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
बैठकीचे प्रभावी सूत्रसंचालन मा. डॉ. वैशिष्ट्य वाळके यांनी केले, तर प्रास्ताविक मा. डॉ. गजाननजी चौधरी साहेब यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. नरेशजी शेंडे यांनी मानले.
या बैठकीला शांतीकुमार गेडाम, डॉ. श्यामजी गेडाम, सुनीलजी भडके, प्रमोदजी निमगडे, छकुल वाळके, डॉ. प्रशांत वाळके, अनिल नाहगमकर, रवींद्र तेलसे, वीरेंद्रजी धुसिया, शिवविलास वर्मा, कपीलजी मेश्राम, रतनलालजी खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
हंसराजभाऊ कुंभारे माजी जिल्हाध्यक्ष बसपा चंद्रपूर यांच्या तर्फे नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा !.

