Wednesday, May 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

भाजपा पदाधिकारी, नगरसेवकांचा पत्रकार परिषदेत थेट हल्लाबोल:

Madhukar gongale by Madhukar gongale
May 20, 2026
in Uncategorized
0 0
0
भाजपा पदाधिकारी, नगरसेवकांचा पत्रकार परिषदेत थेट हल्लाबोल:
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अहेरी नगरपंचायत मध्ये सत्ताधाऱ्यांची मनमानी; नगराध्यक्ष ह्यांनी विनापरवानगी केले घरबांधकाम, अपात्रतेची टांगती तलवार.

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो.नं 9420751809.

नगरपंचायत अहेरीमध्ये सध्या सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार आणि हेकेखोरी पराकोटीला पोहोचली असून, यामुळे शहरातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे खोळंबली आहेत. इतकेच नव्हे तर, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी मंजूर केलेल्या निधीच्या कामांनाही जाणीवपूर्वक आडकाठी घातली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांच्या मार्फत पत्रकार परिषदेत केला आहे. या सर्व मनमानी कारभाराच्या केंद्रस्थानी असलेल्या नगराध्यक्षा रोजा करपेत यांच्यावर नियमबाह्य कामांमुळे अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना भाजप पदाधिकाऱ्यांची नगराध्यक्षांच्या बेकायदेशीर कारभाराचा पाढाच वाचला. नगराध्यक्षा व अहेरीचा प्रथम नागरिक असूनही त्यांनी नगरपंचायतीच्या कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय स्वतःच्या नवीन घराचे बांधकाम नुकतेच नियमबाह्यपणे केले आहे. या गंभीर कायदेशीर उल्लंघनासाठी त्यांना तातडीने पदमुक्त व अपात्र घोषित करावे, अशी रीतसर तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे नोंदवण्यात आली असून, लवकरच भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुराव्यांसह तक्रार दाखल करणार आहे.
याशिवाय, शेजाऱ्याच्या नावे मंजूर झालेली बोअरवेल स्वतःच्या अंगणात बसवून, त्यावर नियमबाह्यपणे वॉल कंपाउंड बांधून घेण्याचा बेकायदेशीर पराक्रमही नगराध्यक्षांनी केल्याचा खळबळजनक आरोप यावेळी भाजपा नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यां कडून ह्यावेळी करण्यात आला.

•बचावासाठी ‘सोयीचे राजकारण’; पक्षाशी एकनिष्ठता कुठे? असा सवाल करीत सध्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्या म्हणून गाजावाजा करणाऱ्या नगराध्यक्षांनी कधीच पक्षाच्या कार्यक्रमांना किंवा ध्येयधोरणांना महत्त्व दिले नाही. त्यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा पक्षावरील प्रेमापोटी नसून, केवळ स्वतःवर येणाऱ्या अपात्रतेच्या कारवाईपासून कायदेशीर बचाव करण्यासाठी आणि स्वतःचे पद वाचविण्यासाठी केलेले ‘सोयीचे राजकारण’ होते, अशी बोचरी टीका भाजप पदाधिकाऱ्यांनी ह्यावेळी केली.

स्वतःच्या गावात ४ वर्षांपासून टँकरने पाणी; विकासकामांना मात्र ब्रेक देत आहेत.
गेल्या चार वर्षांपासून नगराध्यक्षांच्या स्वतःच्या गावात बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जर त्या एवढ्या मोठ्या नेत्या आहेत, तर त्यांनी सहपालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करून तिथे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना का राबवली नाही? असा रोकडा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. स्वतः एकही नवा विकासकाम मंजूर करून आणता आले नाही, मात्र भाजप सरकारने दिलेल्या निधीतील विकासकामांविरुद्ध सहपालकमंत्र्यांकडे खोट्या तक्रारी करून कामांना स्थगिती आणण्याचे काम त्या करत आहेत.
“स्थायी समितीचे सदस्य तथा सभापती विलास सिडाम यांनी संबंधित विकासकामांना स्थायी समितीने रीतसर मंजुरी दिल्याचे लेखी पत्र दिले आहे. मग आता खोटे कोण? सभापती की नगराध्यक्षा? स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या आणि महसूल मंत्र्यांनी निधी दिलेल्या कामांविरोधात सहपालकमंत्र्यांकडे तक्रारी करण्याचे कारण काय?” असा सवाल भाजप पदाधिकारी यावेळी केली.

खोट्या तक्रारींचा पूर्वेतिहास असल्याचे सांगत भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुढे बोलले की, तक्रारींचे राजकारण करण्याचा नगराध्यक्षांचा हा जुनाच पॅटर्न असल्याचा आरोपही यावेळी झाला. यापूर्वी तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्याविरुद्धही ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ अंतर्गत खोटी तक्रार दाखल करण्याचा गंभीर प्रकार घडला होता. पुढे त्या केसचे काय झाले, हे जनतेला कधी समजलेच नाही. त्यासाठी काही संघटनांची दिशाभूल करून त्यांचा वापर करून घेण्यात आला होता, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नगरपंचायतीमधील हा सावळागोंधळ, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची होत असलेली अवहेलना आणि विकासकामांची अडवणूक याविरोधात भाजपचे शिष्टमंडळ लवकरच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन अधिकृत तक्रार दाखल करणार आहे व अहेरीच्या जनतेला न्याय मिळवून देणार आहे.
या वादळी पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, भाजप गट नेते शालिनीताई पोहणेकर, नगरसेवक अमोल गुडेलीवार आणि नगरसेवक विकास उईके प्रामुख्याने उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमुळे अहेरीच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.!!

Previous Post

अहेरी येथे ३० दिवसीय निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In