पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आले.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : अहेरी शहरात आज बकरा ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ७:३० वाजता अहेरी येथील ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करण्यात आली. नमाजासाठी मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण देशवासीयांच्या सुख, शांती, ऐक्य आणि प्रगतीसाठी विशेष दुवा करण्यात आली. नमाज पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत बकरा ईदच्या शुभेच्छा दिल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनाखाली अहेरी पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यामुळे सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.
यावेळी अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बकरा ईदच्या निमित्ताने अहेरी शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी शांतता, सौहार्द आणि बंधुभाव जपत सण साजरा केला.
