विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी
चोपडा:- जिल्हा परिषद शिक्षण विभाग, आरोग्यविभाग, सलाम मुंबई फौंडेशन, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष,जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा चा संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेच होण्याचा दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे.
आज चोपडा येथे गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांचा मार्गदर्शन खाली राहिलेले शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी मुख्यध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी बोलताना गट शिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले यांनी उपस्थित मुख्यध्यपकाना आपली शाळा लवकरच तंबाखू मुक्त करा आपला चोपडा तालुका जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेच करण्यासाठी हातभार लावा या वेळी जन मानवता बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष व जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान ब्रॅण्ड एम्बेसेडर राज मोहम्मद खान शिकलगर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

