राजुरा तालुक्यातील इयत्ता 5 वी ला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचा सहभाग.
कोरपना तालुक्यातील इयत्ता 5 वी ला शिकविणाऱ्या काही शिक्षकांचा सहभाग.
शिक्षण विभागाला सहकार्य अंबुजा सिमेट फाउन्डेशन, उपरवाही यांचा स्तुत्य उपक्रम.
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- अंबुजा सिमेंट फाउन्डेशन, उपरवाही यांचे कडून परिसरातील गावांसाठी व जिल्हयातील गावासाठी नाविण्यापूर्ण उपक्रम सुरु आहेत. मागील दोन वर्षापासून परिसरातील 30 शाळांसोबत शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व सर्व शिक्षक यांचे समन्वयाने विविध शैक्षणिक उपक्रम सुरु केलेले आहे. शालेय भौतिक सुविधा व शालेय गुणवत्ता वाढीसाठी मोलाची मदत होत आहे. यामध्ये पंचायत समिती राजुरा मधील इयत्ता 5 वीचे शिक्षकांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन 2023 करीता परीक्षेची पूर्वतयारी व मार्गदर्शन कार्यशाळा अंबुजा सिमेंट फाउन्डेशन उपरवाही येथे घेण्यात आली. या कार्यशाळेला राजुरा तालुक्यातील 78 शिक्षक व कोरपना तालुक्यातील 10 शिक्षक उपस्थित होते.
या कार्यशाळेत मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित व भाषा या संबंध विषयाचे मार्गदर्शन, प्रश्न पत्रिकेचे स्वरुप, प्रश्न व गुणांचे भारांश तसेच यासाठी असलेला अभ्यासक्रम याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे हे होते. विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती राजुरा येथील गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे हे होते. तसेच गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार हे होते तर कोरपना येथील शिक्षण विस्तार अधिकारी सचिन मालवी, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख राजुरा येथील शिक्षण विस्तार अधिकारी विजय परचाके, संजय हेडाउ यांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बालाजी बावणे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. राजुरा पंचायत समिती माधील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. सर्व शिक्षक पूर्णवेळ उपस्थित होते. मार्गदर्शक शिक्षक राम मानिक, गिरीधर पानघाटे, करुणा गावंडे, संदिप कोंडेकर, सुधीर झाडे, अमित झाडे हे उपस्थित होते.
पंचायत समिती राजुरा येथील गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी सध्या स्पर्धेचे युग असून प्रत्येकानी तत्पर असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना नियमित स्पर्धा परीक्षेबाबतचे नियोजन शाळास्तरावर करण्यात यावे. MISSION RAJURA MPSC हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु करणार असल्याचे यावेळी सांगीतले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बालाजी बावणे यांनी पूर्णवेळ अंकगणित या विषयावर सोप्या पध्दतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसे करता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या नियोजन व आयोजन अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे कार्यक्रम समन्वयक सरोज अंबागडे आणि सुरेश गावंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप कोंडेकर विषय शिक्षक यांनी केले तर आभार सुरेश गावंडे यांनी केले. शिक्षक पूर्णवेळ उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348