राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील मौजा तारसा येथील शांताराम भोयर हे नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरीचे तहसीलदार, तारसा चे पटवारी लोनकर यांना संपर्क करून तातडीने आवश्यक कारवाई करून मृतक कुटुंबियांना शासकीय अर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्याची पुर्तता होऊन आज मृतक भोयर यांच्या पत्नी श्रीमती ताईबाई भोयर आणि मुलगा तिरुपती भोयर यांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती सानुग्रह निधी अंतर्गत ४ लाख रुपयाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. आमदार धोटे यांनी मृतक कुटुंबियांचे सांत्वन केले. गावातील नागरिकांच्या अन्य समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी तहसीलदार के डी मेश्राम, जेष्ठ कार्यकर्ते तथा कृ.उ.बा.स संचालक संभुजी येल्लेकर, तारसा चे सरपंच अजय भोयर, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष विनोद नागापुरे, कृ उ बा स चे संचालक अनंता कुंदोजवार,नितेश मेश्राम तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंडपीपरी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, दर्शना दुर्गे, नितीन धानोरकर, नितीन काकडे यासह,गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थीत होते.