🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- महाराष्ट्र राज्यात गरीब परिवाराच्या पाल्यांना शिक्षणा पासून वंचित करण्याचे कारस्थान करण्यात येत आहे. आज राज्यातील हाजरो जिल्हा परिषदचा शाळा शासनातर्फे बंद करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक मुलाच्या शिक्षणाला ब्रेक मिळणार आहे असे चित्र निर्माण झाले आहे.
अगोदरच राज्यातील अती दुर्गम भागामध्ये मुलाना योग्य शिक्षणाची सोय नाही. ऐकीकडे गाव तिथे शाळा हा संकल्पना आहे. आज अनेक दुर्गम भागामध्ये शाळा नाही. विघार्थाना पायपीट करून नदी नाले ओलांडून दुरवर शाळेत जावे लागते. मात्र शासन जर 94 हजार शाळा बंद करण्यार असेल तर गरीब मुलानी शिक्षण कुठे घ्यायचे? त्यांना भविष्यात शिक्षणाची सरकार कडे काय योजना आहे.त्याना अशिक्षीत ठेवनाची कुटील निती तर नाही आहे ना?
यावर आळा बसला पाहीजे म्हणून शासनाने एक ही शाळा बंद करू नये अशे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाडीच्या वतीने जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. त्या प्रसंगी मनीष कांबळे, चारू आटे, प्रदिप कोल्हे, जिवन उरकुडे. दिलीप कहूरके, प्रदिप मानिकपूरे, प्रणय पाटील, नुतन राठोड, प्रशांत शंभरकर, देवेंद्र त्रिपल्लीवार, संजय गायकवाड, संजय धाबर्डे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348