✒️परभणी जिल्हा प्रतिनिधी
परभणी:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. सर्विकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संपूर्ण राज्यात परतीच्या पावसानं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पाऊसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. त्यात कोट्यावधीचे नुसकान झाले आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने वय, 24 वर्ष असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
दिवाळी आता काही दिवसात येऊन ठेपली असली तरी पाऊसाचा जोर कायम आहे. या पावसानं शेतकऱ्याची कमर मोडली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाचं झालेलं नुकसान आणि खासगी फायनान्सचे घेतलेलं कर्ज कसं फेडायचे या विवंचनेतून गुलाब जीवने यांनी आत्महत्या केली आहे. तरुण शेतकरी गुलाब जीवने यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन लावले होते. मात्र, परतीच्या पावसाने हे सोयाबीन वाया गेले. त्यातच खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज डोक्यावर आणि नुकसान पाहता हे कर्ज फेडायचे कसे व आपला प्रपंच चालवायचा कसा या विवंचनेत गुलाब जीवने यांनी विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर तत्काळ गावकऱ्यांनी त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करुन त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी गुलाब जीवने यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात लहान भाऊ आणि आई आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348