अवघ्या वर्षभरातच पदवी प्रदान करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अवलंबलेला प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी.
सौ. हनिशा, दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- फाइल्स आणि कागदपत्र दाखवून दीड डझन नेत्यामागे चौकशीच्या ससेमीरा लावणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलांची पीएचडी पदवी अवघ्या फक्त 14 महिन्यात मिळवली. व्हायरल कागदपत्रानुसार निल किरीट सोमय्या यांनी आगस्ट महिन्यात प्रबंध सादर केला त्यानंतर म्हणजे दीड महिन्यातून म्हणजे ऑक्टोबर मध्ये तोंडी परीक्षा घेण्यात आली विशेष म्हणजे तोंडी परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी पीएचडी पदवी मुंबई विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आली सामान्यता पाच ते सहा वर्षाची पीएचडी प्रक्रिया असते परंतु नोंदणी नंतर अवघ्या वर्षभरातच पदवी प्रदान करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अवलंबलेला प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे सिद्धांत पुणेकर यांनी विद्यापीठाला पत्र लिहून निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348