संजय मामा टिळेकर उप संपादक
पिंपरी :- पुणे जिल्हातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका नराधम बापाने आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हे सर्व प्रकार मागील पाच महिन्यांपासून सुरू होता. ही संतापजनक घटना निगडी येथे १८ मार्च २०२२ ते २३ जुलै २०२२ या कालावधीत घडली. या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईने सोमवारी दि. २५, जुलै ला निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिनुसार, आरोपीने पीडीत मुलीशी लैंगिक गैरवर्तन केले तसेच लैंगिक हमला करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे गुन्हा दाखल केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.