म. स. न्यू. क्राईम रिपोर्टर गुजरात:-
गुजरात राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विषारी दारू पिऊन अनेक लोकाचे जीव गेल्याने समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. बोटाद जिल्ह्यातील विषारी दारूच्या बळींची संख्या 33 झाली आहे.अवैध दारू विक्रेत्यांनी गावठी दारू म्हणून पाणी मिसळलेले जहाल विषारी मिथेल अल्कोहोल (मिथेनॉल) ग्रामस्थांना पाजले होते. मृतांच्या रक्त तपासणीतून ही बाब स्पष्ट झाली, असे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी गांधीनगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. खून व अन्य गुन्ह्यांसाठी 14 जणांविरुद्ध तीन प्राथमिक माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आली असून, बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. प्रकृती बिघडू लागल्याने बोटादच्या रोजीद आणि आसपासच्या गावांतील लोक एकापाठोपाठ बारवेला व बोटाद येथील सरकारी रुग्णालयांत दाखल होऊ लागल्यानंतर सोमवारी सकाळी हे प्रकरण उजेडात आले. विषारी दारू पिल्यामुळे आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 22 जण हे बोटाद जिल्ह्यातील विविध गावचे रहिवासी असून, सहाजण लगतच्या अहमदाबाद जिल्ह्यातील धनधुका तालुक्यातील आहेत. याशिवाय भावनगर, बोटाद व अहमदाबाद येथील रुग्णालयांत सध्या 45 हून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत.गुजरातमध्ये दारू बंदी असून मोठ्या प्रमाणात विषारी दारू विकली जात आहे. बंदी कुठे आहे, असा सवाल अनेक नागरिक करत आहे. विषारी दारू विकणाऱ्यांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोप अनेक विपक्ष नेते करत आहे. विषारी दारूच्या विक्रीतून मिळणारा पैसा जातो कुठे याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. संपूर्ण गुजरात मध्ये दारू बंदी आहे. त्यामुळे पोलिस मोठ्या प्रमाणात अवैध दारू माफिया वर कारवाई करत असतात. त्यामुळे असे दारू माफिया धाडींमुळे रसायनांकडे वळले गुजरातमध्ये हात भट्टी चालकांना धाडींमुळे गावठी दारू तयार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ते अशा रसायनांत पाणी मिसळून त्यांची गावठी दारू म्हणून विक्री करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.अहमदाबाद येथील एका गोदामात व्यवस्थापक म्हणून काम करणार्या जयेश ऊर्फ राजू याने त्याच गोदामातून 600 लिटर मिथेल अल्कोहोल चाेरून ते बोटाद येथील त्याचा नातेवाईक संजय याला 40 हजार रुपयांत विकले होते. हे औद्योगिक विद्रावक (दुसरा पदार्थ स्वत:मध्ये विरघळवून घेणारा) आहे हे माहीत असूनही संजयने हे रसायन अवैध दारू विक्रेत्यांना विकले.या विक्रेत्यांनी नंतर त्यात पाणी मिसळून त्याचे पाऊच तयार केले आणि गावठी दारू म्हणून त्यांची 25 जुलैला रोजीद, रानपरी, चंदारवा, देवगणा, चोकडी या गावांसह बोटाद जिल्ह्यातील अन्य गावच्या ग्रामस्थांना विक्री केली, असे तपासात समोर आले. दरम्यान, पोलिसांनी यापैकी 460 लिटर रसायन जप्त केले आहे.मी पिंटू देवीपूजक याच्याकडून 2000 रुपयांत 20 लिटर मिथेनाॅल विकत घेतले होते, असे गावठी दारू विकणाऱ्या गजुबेन वड्डारिया हिने पोलिसांना सांगितले. मिथेनॉल विकत घेतल्यानंतर त्यात पाणी मिसळून त्याचे पाऊच 20 रुपयाला एक याप्रमाणे अनेक ग्रामस्थांना विकले, असे ती म्हणाली.