दिलीप दहागावकर, धाबा तोहोगाव प्रतिनिधी
गोंडपिपरी:- दिवाळी सनाचे औचित्य साधून फराळ महोत्सव महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष प.स.गोंडपिपरी अंतरगत दिवाळी फराळ महोत्सानिमित्त पंचायत समिती च्या मैदानावर आयोजन करण्यात आले. सदर महोत्सवात स्वयंसहायता समुहामर्फत उत्पादक गटामार्फत तयार केलेले फराळ विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. सदर महोत्सवाचे उद्घाटक श्री.कमलाकर मेश्राम ,तहसीलदार गोंडपिपरी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी श्री शरद परखी (बाल विकास प्रकल्प अधिकारी) तसेच श्री देवराव नगराळे(अधिक्षक प.स.गोंडपिपरी) उपस्थित होते.
सदर मोहत्सव दिनांक १७/१०/२०११ते २१/१०/२०२२ एकूण पाच दिवस राहणार आहे.या प्रसंगी गोंडपिपरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आव्हाहन श्री कमलाकर मेश्राम यांनी केले.सदर महोत्सवात.दिवे, तोरण, सजावट वस्तू,पूजेचे सामान, खाद्य पदार्थ, रांगोळी, देव देवितांचे फोटो इत्यादी विक्रीसाठी ठेवले आहे.
सदर महोत्सवाला यशवी करिता श्री पंकज गोटपरतीवार. श्री संतोष वाढई, श्री गिरिधर चारडुके, श्री प्रकाश रामटेके, श्री नंदकिशोर हिंगाने, मंगेश कुत्तरमारे, श्री प्रशांत भडके, श्री राजेन्द्र झरकर यांनी सहकार्य केले.

