सिंदेवाही – तालुका प्रतिनिधी मुकेश शेंडे
नवोदय विद्यालय चंद्रपूर ने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी आणि बारावीचा शंभर टक्के निकाल दिला आहे. दहावीत पियुष शेंडे हा 97.60 टक्क्यासह प्रथम आलेला आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि मेंढा माल या खेड्या गावातील व सामान्य आर्थिक परिस्थिती ला मात देऊन जिद्द ,चिकाटी, बौद्धिक परिश्रम घेऊन यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र चंद्रपूर जिल्ह्यामधून अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे त्यांचे हितचिंतक मुकेश शेंडे, स्विटी शेंडे, मृणाली शेंडे यांचा कडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.