श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- जिल्हात दिवसेंदिवस क्राईम रेट वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारताच क्राईम रेट वर अंकुश लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर नुसताच पदभार स्वीकारला असून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेले सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे आदेश पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना दिले होते. मात्र तरी देखील काही ठिकाणी अवैध धंदे सुरुच असल्याचे विशेष पथकाने टाकलेल्या धाडीतून निदर्शनास आले आहे. तर काही पोलिस स्टेशन मध्ये अनेक गुन्ह्याचा तपास रखडलेला आहे. अशा 17 पोलिस स्टेशन प्रमुखांना पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी थेट नोटीस काढत कामकाज सुधारण्याचे आदेश दिले आहेत.
आमच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत सर्व काही सुरळीत सुरु असल्याचा आव पोलिस स्टेशनचे प्रमुख आणतात मात्र एसपींच्या विशेष पथकाने ठिकठिकाणी धाडी टाकून अनेक पोलिस स्टेशनच्या हद्दीत राजरोज सुरु असलेल्या अवैध धंद्याचा पर्दाफास केलेला आहे.. पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी पदभार घेतात सर्व ठाण्यांना स्वत: भेटी देवून कारभार पारदर्शक करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र तरी देखील काही ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. हे विशेष पथकांनी टाकलेल्या धाडीतून समोर आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील 17 ठाणेप्रमुखांना एसपी ठाकूर यांनी स्वत: नोटीस काडत कामकाज सुधारण्याच्या सुचना केल्या आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348