मनवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- शहरामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या खळबळजनक खासगी बसच्या भीषण अपघात व ज्वलन कांडाने संपर्ण महाराष्ट्र हादळला होता. त्यामुळे खाजगी बस वाहतुकीवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. याघटनेमुळे पोलिस प्रशासनाने अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस वर कारवाईचा सपाटा लावला आहे.
आज जिल्हात आणि इतर भागातून येणाऱ्या खाजगी बस मध्ये वाहतूक परिवहन विभागाकडून आखून दिलेल्या नियमाला सरास पायाखाली तुडवत आपला व्यवसाय करत आहे. त्यामुळे आपात्कालीन स्थितीत अशा खाजगी बस मध्ये कुठल्याही प्रकारचा उपयोजना करण्यात येत नाही. अनेक खाजगी बस मध्ये आपात्कालीन दरवाजा नसते त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव धोक्यात येऊ शकते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348