आमदार सुभाष धोटे यांनी घेतला गोंडपिपरीतील पुरपरिस्थितीचा आढावा. अतिवृष्टीग्रस्थांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश.
राजू झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :– आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन, अडेगांव, पनोरा, धामणगाव, सुपगाव, दरुर, चेक दरुर, सालेझरी, पोडसा इत्यादी आतीवृष्टी व पूरपरीस्थिती मुळे नुकसान झालेल्या शेती, शेतीपिक व गावांना अधिकाऱ्यांसह भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. स्थानिक नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिक यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांचे सांत्वन केले. मौजा नंदवर्धन येथे प्रशासकीय अधिकारी आणि परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तलाठी आणि गावकरी यांच्या उपस्थित आतीवृष्टी मुळे झालेले नुकसानीवर आढावा बैठक घेण्यात आली. यात आमदार धोटे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की, अतिवृष्टी आणि पुराने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. तेव्हा सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने सरसकट नुकसान भरपाई मिळणेसंदर्भाने कार्यवाही करण्यात यावी. सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. तसेच साथीचे आजार पसरणार नाही यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या.
या प्रसंगी अतिवृष्टी आणि वीज कोसळून राळापेठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे झालेल्या नुकसानीची भरपाई आपत्ती व्यवस्थापन स्थानिक निधी अंतर्गत आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ५० हजार रुपये निधी शाळेचे मुख्याध्यापक व सरपंच यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच सकमुर येथील मोतीराम राजेश्वर तोहगावकर यांचे दिनांक १६ जुलै रोजी विद्युत तारांच्या स्पर्शाने निधन झाले होते. सदर मृतकाचे परिवारास आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन कुटुंबातील पत्नी निर्मला, मुलगा महेश व कुटुंबीयांचे सांत्वन केले. फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात आर्थिक मदत केली.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डव्हळे, तहसीलदार के डी मेश्राम, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सं गां नि योजनेचे अध्यक्ष मनोज नागपुरे, कृ.उ.बा.स सभापती अशोक रेचनकर, शालिक झाडे, विलास नागापूरे,विजय चौधरी देविदास सातपुते, बालाजी चनकापुरे, नंदवर्धन चे सरपंच राजेंद्र चौधरी, जनार्धन ढुमने, सुनील झाडे, भोयर ताई, चौधरी ताई राजु राऊत, उषाताई धुडसे, सुनील कुडे, लहू कुडे यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.