राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
चंद्रपूर:- भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून मंत्री ना. सूधीरभाऊ मुनगंटीवार यांना खालील कामे मंजूर करण्यास निवेदन देण्यात आली.
नाबार्ड योजनेंतर्गत -धाबा ते सोमनपल्ली रस्ता डांबरीकरण, धाबा-डोंगरगाव-चेकदरूर रस्ता डांबरीकरण, भंगाराम तळोधी ते राळापेट रोड व पूल बांधकाम, धाबा ते किरमिरी रोड व पूल बांधकाम.
तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत, वढोली ते लिखितवाडातून जाणाऱ्या रोडच्या दोन्हीबाजूला सिमेंटकांक्रीट नाली बांधकाम.
यावेळी निवेदन देतांना माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार, प पू शेषराव महाराज व्यसन मुक्त केंद्र अध्यक्ष गणपती चौधरी, हिवरा सरपंच निलेश पूलगमकर, राहूल चौधरी, माजी पं स सभापती दिपक सातपुते, आदि उपस्थित होते.भाऊंनी सदर कामे लवकरच मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.

