मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक :- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे एका 30 वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना जुने नाशिक भागातील आसराची वेस येथे घडली आहे. स्वरूप उर्फ सनी शरद बोडके रा.दिक्षीतचाळ, मोदकेश्वर मंदिराजवळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बोडके यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोडके याने गुरूवारी दि.२० रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील खोलीत बल्लीस दोरी बांधून गळफास लावून घेतला. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

