मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- SMBT सेवाभावी संस्थेच्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या वतीने धामनगाव येथे जागतिक हेपेटायटिस (यकृताचा दाह) दिवस निमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी वैद्यकिय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
आज मोठ्या प्रमाणात हेपेटायटिस (यकृताचा दाह) रोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक लोक मृत्यूच्या कवेत जात आहे. त्याचे प्रमाण कमी होण्यासाठी गावातील गल्लोगल्लीत विद्यार्थ्यांनी जनजागृतीवर पथनाट्य साजरे करून जनजागॄती केली. यकृताचा दाह हा रोग विषाणु जन्य असुन याचा फैलाव एका पासुन दुसऱ्याला होतो. त्यामुळे याची काळजी वेळेत घेणे गरजेचे गरजेचे आहे. हृा रोग मुख्यत दारूच्या अति सेवनाने होतो. दारूच्या अति सेवनाने यकृताला सुज येते पुढे जावुन याचे रूपांतर कॅन्सर मध्ये होवु शकते त्यामुळे याकडे दुर्लक्ष नकरता वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे असेही पथनाट्याद्वारे गावकरण्यांना सांगण्यात आले. SMBT च्या या जनजागृती अभियनाचे गावकर्यांनी कौतुक करून आभार व्यक्त केले. यापुढेही SMBT ने असे जनजागृती अभियान राबवुन जागृती करावी अशी अपेक्षा गावकऱ्यानी व्यक्त केली.