पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
चंदननगर पोलस स्टेशन पुणे शहर
पुणे. दि. २४/१०/२०२२ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे चंदननगर पो स्टे यांना इसम नाम महिराम विष्णोई रा. संघर्ष चौक, अगरवाल हॉस्पीटल समोर साठे यांचे बिल्डींग मध्ये आफुचे बोंडांचा चुरा ठेवून, त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वपोनि राजेंद्र लांडगे यांनी पो. नि. गुन्हे श्री. रविंद्र कदम यांना कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश केल्याने पो नि. गुन्हे रविंद्र कदम , सपोनि सोनवणे म.पो. उप-निरी मुळूक, व पोलीस स्टेशन कडील स्टॉफ असे पंचासह बातमीचे ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री झाल्याने वाजता छापा टाकुन इसम नाम महिराम मनाराम बिष्णोई वय २८ वर्षे रा. व्दारा / ज्ञानेश्वर साठे, सर्वे नं.४५/६ संघर्ष चौक, अगरवाल हॉस्पीटल समोर, चंद्रभागा बिल्डींग चंदननगर पुणे. (मुळ गाव, संगिता कॉलणी, लोआवट, जि. जोधपुर राजस्थान) याचे ताब्यात ६०,०००/ रु. कि.चा ०६ किलो ०५ ग्रॅम वजनाचा एका नायलॉनच्या पोत्यामध्ये अफुचा बोड्याचा बुरा असलेला अमलीपदार्थ मिळुन आला तो जप्त करुन त्याब्यात घेतला आहे.
आरोपी विरुध्द सपोनि श्री सोनवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून चंदननगर पोलीस स्टेशन गु. रजि. नं.३७६/२०२२ एन.डि. पी. एस अॅक्ट कलग १७ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दि. २८/१०/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड दिली आहे दाखल गुन्हयाचा तपास पोनि (गुन्हे) सो रविंद्र कदम हे करीत आहेत.
सदरची कारवाई हि मा. पोलीस आयुक्त, अमिताभ गुप्ता सी पुणे शहर, श्री. नामदेव चव्हाण सो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री रोहीदास पवार सो पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर, श्री. किशोर जाधव सौ, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे यांचे मार्गदर्शना खाली व श्री. राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन पुणे श्री. रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सपोनि श्री सोनवणे, म.पो. उपनिरीक्षक गुळुक चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे यांचे दिमतीत पो अमलदार भुजबळ अविनाश संकपाळ सुहास निगडे महेश नाणेकर, शिवाजी धांडे, श्रीकांत शेंडे, प्रदिप धुमाळ, गणेश हांडगर, विकास कदम, शेखर शिंदे, अनम सांगळे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, सचिन चव्हाण, आव्हाड गडदरे यांनी केलेली आहे.

