पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
वारजे पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे : वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार नागे अविनाश रामप्रसाद गुप्ता, वय २०, रा. वेदगौरव सोसायटी शिंदे पुल, शिवणे, पुणे व त्याचे इतर १३ साथीदार यांचेवर शरीरा विरुध्द गुन्हे दाखल आहेत.
यातील आरोपी नामे १ अविनाश रामप्रसाद गुप्ता, वय २०, रा. वेदगौरवसोसायटी. शिंदे पुल, शिवणे, पुणे हा मुख्य (टोळी प्रमुख) असुन त्याने त्याचे इतर साथीदार २ सागर भागवत वारकरी, वय २२. रा. राहुलनगर, शिवणे, पुणे ३. अविनाश सुरेश शर्मा, वय १९, रा. रामनगर, वारजे पुणे ४. विकास सिब्बन गौड, वय १८, रा. राहुलनगर, शिवणे, पुणे ५. आकाश सिब्बन गौड, वय १९, रा. सदर ६. म्हम्या उर्फ संदिप नथुराम खैरे, वय- ४१. रा. रामनगर, वारजे, पुणे ७. मेहबुब बाबु दफेदार, वय १९, रा. शिवणे, पुणे व ७ विधीसंघर्षीत बालके यांचेसह वारजे पोलीस स्टेशन परिसर या भागात खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी, शस्त्र बाळगणे, गैर-कायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, लोकांचे जिवीतास धोका निर्माण करण्याचे उद्देशाने दहशत निर्माण करणे, गर्दी मारामारी करणे अशा स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. सदर आरोपी यांचेविरूध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.३७४/२०२२. भा.द.वि. कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६ (२), आर्म अॅक्ट ४ (२५). म.पो. अधि.३७ (१) (३) १३५ क्रि. अ. अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केलेला आल्याचे दिसून आलेने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१)(ii) ३ (२) व ३ ( ४ ) चा अंतर्भाव करणेकामी वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दगडु हाके यांनी मा. श्रीमती पीर्णिगा गायकवाड पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, पुणे शहर यांचे गाफतीने गा. श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करून आरोपी नामे १ अविनाश रामप्रसाद गुप्ता, वय २०, रा. वेदगौरव सोसायटी, शिंदे पुल, शिवणे पुणे हा मुख्य (टोळी प्रमुख) २. सागर भागवत वारकरी, वय २२, रा. राहुल नगर, शिवणे, पुणे ३. अविनाश सुरेश शर्मा, वय १९, रा. रामनगर, वारजे, पुणे ४. विकास सिब्बन गौड, वय १८, रा. राहुलनगर, शिवणे, पुणे ५. आकाश सिब्बन गौड, वय १९, रा. सदर ६. म्हम्या उर्फ संदिप नथुराम खैरे, वय ४१. रा. रामनगर, वारजे, पुणे ७ मेहबुब बाबु दफेदार, वय १९, रा. शिवणे, पुणे व ०७ विधी संघर्षीत बालके यांचेविरूध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०४/२०२२. भा.द.वि. कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८. १४९, ५०६ (२), आर्म अॅक्ट ४ (२५) म.पो.अधि. ३७(१)(३) १३५ क्रि अगे अॅक्ट कलम ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( ४ ) अंतर्भाव करण्याची मा. श्री. राजेंद्र डहाळे साहेब, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे यांनी मान्यता दिली आहे…
सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती *रुक्मिणी गलांडे* , सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री अमिताभ गुप्ता. मा. पोलीस सहआयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, पुणे शहर, श्रीमती पौर्णिमा गायकवाड मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर श्रीमती रुक्मिणी गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दगडु हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री दत्ताराम बागवे, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार सचिन कुदळे, अमोल मिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे व महिला पोलीस
अंमलदार प्रियांका कोल्हे यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंगलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ४० वी व एकुण १०३
आहे.

