राजेंद्र झाडे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
गोंडपिपरी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसूद्धा श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थानच्या वतीने कोंडय्या महाराज यांची 83 वा पूण्यतिथी निमित्त वारकरी मंडळाच्या भजनाने भक्तिमय वातावरणात असंख्य भक्तांचा भक्तिने धाबा परिसर रंगून गेला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमर आणि सौ. वैष्णवी बोडलावार तसेच नंदकिशोर व सौ. नलिनी तुंडूरवार दंपती हस्ते महाराज यांचा अभिषेक करून पालखी मिरवणुक तसेच शेवट आरतीने समारोप करण्यात आले.
यावेळी नंदकिशोर तुंडूरवार यांच्याकडून सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. या उत्सवाचा व्यवस्था संस्थेचे अध्यक्ष अमर बोडलावार, उपाध्यक्ष बाबूराव बोमकंटीवार, सचिव किशोर अगस्ती, कोषाध्यक्ष स्वप्नील अनमूलवार, सदस्य डॉ. अ.टी. कातकर, प्रकाश कावळे, मनोज कोपावार, विठ्ठल चानकापुरे, शेगमावर महाराज या सर्वांचा देखरेखीत धार्मिक रीतीरिवाजात पार पडले.
पुण्यतिथी महोत्सव सर्व गावकऱ्यांचा सहकार्यातून यशस्वी रितीने संपन्न झाल्याबद्दल सर्व भक्तांचे संस्थेचा वतीने आभार मानण्यात आले.

