Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home

प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉरसाठी आयोजित केलेल्या पहिल्याच व्यापक बैठकीचे फलित, जिल्हा प्रशासनाने सोमवारी आयोजित केली बैठक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 30, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉरसाठी आयोजित केलेल्या पहिल्याच व्यापक बैठकीचे फलित, जिल्हा प्रशासनाने सोमवारी आयोजित केली बैठक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

‘आस्था जगाची, अस्मिता परळीची’ संकल्पनेसाठी सजग नागरिकांनी दिल्या शेकडो सूचना, विकासासाठी जनतेने केला निर्धार

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड/परळी:- ‘आस्था जगाची, अस्मिता परळीची’ संकल्पना घेऊन शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राष्ट्रमाता जिजामाता उद्यानात ही बैठक रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या बैठकीला भाविक भक्त तथा सजग नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात वैद्यनाथ कॉरिडॉरच्या माध्यमातून परळी वैजनाथ परिसराचा कसा विकास साधता येईल याबाबत शेकडो सूचनांचा वर्षाव झाला. सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती हे मोठे वैशिष्ट्य ठरले. त्याची सकारात्मक परिणीती अशी झाली की परळी वैजनाथच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी सोमवार दि. ३१ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता त्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे.

नागरिकांच्या बैठकीत काशी विश्वनाथ, उज्जैन यांच्या धर्तीवर जर परळी वैजनाथ येथे वैद्यनाथ कॉरिडॉर झाला तर येथील व्यापार, हॉटेलिंग, लॉजिंग आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते हा विचार प्रामुख्याने समोर आला.

वैद्यनाथ हे धन्वंतरी समजले जातात. त्या अनुषंगाने आसपासच्या मेरुगिरी पर्वतरांगांचे जतन करून त्यावर आयुर्वेदिक वनस्पती उद्यान (बोटॅनिकल गार्डन) तयार करता येऊ शकते. शक्य असल्यास मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ – औंढा नागनाथ – घृष्णेश्वर जोडण्यासाठी काही करता येईल का यावर ही विचार व्हायला हवा असे काहींनी मत मांडले.

आजकाल जमाना मार्केटिंगचा आहे त्यासाठी परळीचे महत्त्व सांगणारे पुस्तक, वेबसाईट यांची मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेत प्राथमिक स्तरावर निर्मिती करण्याची संकल्पना मांडण्यात आली. तसेच सोशल मीडियावर अर्थात फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अप, इन्स्टाग्राम आदी माध्यमातून वैद्यनाथ कॉरिडॉरचे महत्त्व सांगण्यासाठी मार्केटिंग करणे ही काळाची गरज आहे आणि इथल्या नागरिकांचे कर्तव्य आहे अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

वैद्यनाथ कॉरिडॉरसाठी आवश्यक पाठपुरावा
या प्रकल्पासाठी प्रशासनाने तत्काळ प्रस्ताव तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठवणे महत्त्वाचे आहे. प्रस्ताव व प्रारूप आराखडा तयार करताना कागदपत्रांची कोणतीही कमी राहू नये यासाठी उपविभागीय अधिकारी महोदयांच्या बैठकीत चर्चा केली जाईल. तसेच याबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी काशी विश्वनाथ, उज्जैन या सध्या कॉरिडॉर झालेल्या / होत असलेल्या ठिकाणी आपल्या इथून अभ्यास दौरा आयोजित करता येईल का याची चाचपणी केली जात आहे.

डिव्हाईडेड बाय पार्टीज, युनायटेड बाय डेव्हलपमेंट
बैठकीत ज्या पद्धतीने सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग होता त्याच पद्धतीने विविध पक्षात कार्यरत असणाऱ्या तसेच कोणताही राजकीय संबंध नसलेल्या नागरिकांची उपस्थिती हा चर्चेचा विषय झाला आहे. वैद्यनाथ मंदिर व परिसराचा विकास या एकाच ध्येयाने सर्वांनी एकत्र येऊन सदैव काम करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी एकमताने व्यक्त केला.

काही तत्काळ उपाययोजनाच्या सूचना..
यावेळी काही सूचना समोर आल्या ज्यात परळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यनाथ मंदिराकडे जाणारे दर्शन फलक लावावेत जेणेकरून बाहेरगावच्या भाविकांची सोय होईल, काही बसेस ब्रॅण्डिंग कराव्यात. मंदिर परिसर आणि तीर्थांची स्वच्छता करणे. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी नगरेश्वर मंदिर तसेच महात्मा बसवेश्वर चौक ते दक्षिण मुखी गणपती पर्यंत जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद करावा, शिर्डीच्या धर्तीवर स्थानिक रोजगारांना प्राधान्य देण्यात देता येईल का यावर विचार व्हावा; असे विविध विषय चर्चेला आले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348 / 7385445348

Previous Post

Скачать приложение Mostbet для Android APK и iOS в 1 клик 202

Next Post

महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही, महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही, महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही.

महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही, महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In