राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी (देशपांडे) येथील नाल्यासमोर वैनगंगा नदीच्या काठावर अज्ञात महीलेचा मृतदेह आढळून आला हा धक्कादायक प्रकार आज दि 29 रोज शूक्रवारला समोर आला आहे शिवणी देशपांडे येथील नदीकाठावर विदयूत र्टान्सफाॅरम जवळ अज्ञात महीलेचा मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून असल्याची गुप्त माहिती गोंडपिपरी येथील ठाणेदार जिवन राजगूरू यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. माहीतीच्या आधारावर ठाणेदार जिवन राजगूरू यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून ठाणेदार यांनी मृतदेहाचा पंचनामा करून त्याब्यात घेतले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळें ओळख पटवने शक्य झाले नाही.
मृतदेह वैनगंगा नदीपात्रातुन 50 फूट अंतरावर होते आठवडाभर पूर परिस्थिती असल्याने मृतदेह वाहून आला की घातपात आहे या अनुषंगाने पोलिस तपास करीत असून प्लास्टिक मध्ये गुंडाळून मृतदेह मिळाल्याने घातपाताची शक्यता वर्तवली जा तपासणी आहे मृतदेह उतरनिय तपासणी साठी पाठवले असून पूढील तपास ठाणेदार जिवन राजगूरू हे करीत आहेत