पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी….
सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे दि. ३०/१०/२०२२ रोजी सिहंगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं.४६० / २०२२ भा.द.चि.क ३०२.३४ अन्वये नोदं करण्यात आला होता, दाखल गुन्हयातील गारवा हॉटेलवे मैनेजर मयत नामे भरत भगवान कदम, वय २४ वर्षे, व्यवसाय चालक, फ्लॅट नं ४०५ धायरेश्वर प्राईड बिल्डींग, राममंदिरसमोर, मतेनगर, धायरी, पुणे हे रात्री ००.०० ते ००.२५ वा. दरम्यान धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौककडे जाणा-या रस्त्याच्या पुर्वेस निर्मिती असोशिएटस बिल्डींगचे समोरील गायकवाड यांचे रिकामा प्लॉट, पायरी पुणे येथुन त्याचे मोपेड गाडीवरुन राहते घरी जात असताना अचानकपणे मागुन आलेल्या चार ते पाच अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून मयताचे अंगावर ठिकठिकाणी ४८ वेळा धारदार कोयत्याने वार करून त्यास मारून अत्यंत निर्दयी व कुरपणे खुन केला असल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयाचे घटनास्थळ मुख्य रोडपासून आतमध्ये निर्मनुष्य असल्याने सदर ठिकाणी कोणतेही सी.सी.टि.व्ही फुटेज मिळुन आले नाही सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सदर घटनास्थळावर जाणारे येणारे रोडवरील सर्व सी. सी.टि.व्ही फुटेजची तपासणी करुन तांत्रिक विश्लेष्णची पडताळणी करून सर्व बाजुने आरोपीचा शोध घेतला. त्यादरम्यान सपोनि सचिन निकम यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हा हा आरोपी नामे अनिकेत मोरे व त्याचे इतर साथीदार यांनी केलेला असून सदरचे आरोपी हे धायरेश्वर मंदिराचे पाठीमागील बाजुस बसले आहेत अशी खाजीशीर बातमी मिळाल्याने शैलेश सरखे वपोनि व जयंत राजुरकर पोनि (गुन्हे) सिंहगडरोड पो स्टे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन निकम व तपास पथकातील पोलीस अंमलदार याचेसह बातमीचे मिळाले बातमीच्या ठिकाणी जावुन आडबाजुस थांबुन बातमीप्रमाणे खात्री केली असता, धायरेश्वर मंदिराचे मागे चार इसम बसलेले असल्याचे दिसल्याने त्यांना काही कळायचे आत मध्येच ताख्यात मेथुन त्याना त्याचे नाव पत्ते विचारता त्यांनी त्याचे नाव पत्ता १) अनिकेत अरुण मोरे वय २५ वर्षे रा. सध्या फ्लॅट नं. २३ मुक्ताई व्हीला बेनकरवरती धायरी पुणे. मो.नं. रुम नं.१६ झेड ११ राहुल नगर डॉ. बाबासाहेब वासहत सेक्टर नं.२२ पवळे हायस्कुल जवळ निगडी २) धीरज शिवाजी सोनवणे वय १९ वर्षे रा. पंडीत दीनदयाळ शाळा, गणेशनगर तळमजला भारतकुंज अपार्टमेंट कोथरूड पुणे. ३) सनी उर्फ योगेश हिरामण पवळे वय १९ वर्षे रा. वसंत नगर येराईराड, खडकेश्वर मित्रमंडळ चौक, शंकर मंदिराशेजारी कोथरूड पुणे. व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता, यातील मयत भरत कदम व आरोपी अनिकेत मोरे हे एकमेकांचे ओळखीचे असुन याच्यामध्ये सुमारे चार ते पाच महिन्यापूर्वी एकाच महिलेवर असलेल्या प्रेमसंबधाच्या अनुशंगाने झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी याने त्याचा सावन्त नाऊ नामे धीरज सोनवणे व त्याचे मित्र यांचेकरबी मयताचा खुण केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यामध्ये एक विधीसंघर्षित बालक असुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास प्रविण जाधव सहायक पोलीस निरीक्षक सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त सो, मा. संदिप कर्णिक पोलीस सह आयुक्त सो मा. श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेक्षिक विभाग, पुणे मा. श्रीमती पोर्णिमा गायकवाड पोलीस उप-आयुक्त सो परि ३, पुणे मा. श्री. सुनिल पवार, सहा. पोलीस आयुक्त सो, सिंहगड रोड विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. श्री. जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. श्री. सचिन निकम, सहा.पोलीस निरीक्षक श्री. दिपक कादमाने सहा. पोलीस निरीक्षक श्री. आबा उत्तेकर, सुनिल चिखले, सहा. पोलीस फौजदार, पो. हवा. संजय शिंदे, पोलीस अंमलदार अमित बोडरे, अमेय रसाळ, देवा चव्हाण, राहूल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोडे, अमोल पाटील, स्वप्नील मगर, विकास पांडुळे, विकास बादल, सागर शेडगे, केतन लोखंडे, गणेश झगडे, गौतम किरतकुडवे, संतोष शेंडे यांनी केली आहे..

