देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
नागपूर/हिंगणा:- वडधामना मार्गावरील चौकात दि.22 जुलै ला रात्री 12 वाजेदरम्यान आठवा मैल अमरावती रोड नागपूर निवासी रुपेश थोरात या युवकाचे अपघाती निधन झाले, परीवाराचा कर्ता तरुण पूरुषाच्या निधनानंतर या आघातामुळे परीवाराची वाताहत झाली आठ वर्षे वयाचा मुलगा असुन पत्नी आई भाऊ अत्यंत मानसिक तणावात आहेत.
रुपेश थोरात हे दवलामेटी विभागाचे बसपाचे माजी पदाधिकारी होते. सोबतच सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यकर्ते होते ऐक जबाबदार व्यक्तीमत्व म्हणून परीसरात ख्यातीप्राप्त होते. रुपेशवर परीवाराची संपूर्ण सांभाळ व भरणपोषणाची जबाबदारी होती. त्यामुळे परीवारावर कोसळलेले हे संकट खूप भयावह तथा परीवाराचा मुख्यकर्ता युवक मुत्यु पावल्याने परीवार निराधारच झाला आहे.
या घटनेला आज आठवडा झाला आहे परंतु अपघात करणारा आरोपी मोकाटच आहे, त्यामुळे बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभा वाडी शहर शिष्ठमंडळाच्या वतिने वाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले प्रसंगी साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांच्या कडे बसपा शिष्टमंडळाने निवेदन देऊन अतिशीघ्र तपास करुन आरोपीस अटक करण्याची मागणी केली त्यावर वाडी पोलीस स्टेशन चे साहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी या अपघात प्रकरणाचे तपास अधिकारी लवकरच योग्य दिशेने जलद तपास करुन आरोपीस पकडून थोरात परीवारास न्याय मिळवून देण्यास कर्तव्य पार पाडतील असे आश्वासन देण्यात आले.
निवेदन देताना बसपाचे हिंगणा विधानसभा अध्यक्ष महेश वासनिक, वाडी झोन प्रमुख सुधाकर सोनपिपळे, वाडी शहर अध्यक्ष गौतम मेश्राम, हिंगणा झोन प्रमुख सुरेश मानवटकर, प्रदिप डोंगरे, गोपाल मेश्राम, शंकर पाटील, गौतम तिरपूडे, राहुल सोनटक्के, राष्ट्रपाल वाघमारे, सुरज वानखेडे, मिलिंद गजभिये, पंकज ठोमगठ, प्रदिप मस्के, विक्रात थोरात, दिनेश शिंदे, जगदीश धावडे, प्रभा थोरात, उमेश थोरात, दिलीप चटप, देवानंद वाहाने, अमर लोमसोंगे, प्रकाश चवरे, शेखर सरदार यांच्यासह इत्यादी बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.