पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे : सावकारी कायदयान्वये गुन्हा दाखल यातील तक्रारदार नामे हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांनी आरोपी *उमेश वाफगावकर, रुपेश मारणे, अनिल लोळगे, नितिन ननावरे* यांचेकडुन बांधकाम व्यवसायाकरीता वेळोवेळी १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात तक्रारदार यांनी परतफेड म्हणून २ कोटी ३० लाख रुपये दिले असतानादेखील आरोपी है आणखी ६५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करत होते. तसेच आरोपी *रुपेश मारणे* याच्या सांगण्यावरुन तक्रारदार यांनी बांधकाम केलेल्या कर्वेनगर, पुणे या बिल्डिंग मधील १२ फ्लॅट करार पत्राव्दारे सिक्युरिटी म्हणून आरोपीतांनी स्वतःकडे ठेवुन ते विक्री करण्यास अडथळा निर्माण करुन तक्रारदार यांना धमकावत असलेबाबतची तक्रार खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांचेकडे प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची वरीष्ठांचे आदेशाने खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा पुणे शहर येथे सविस्तर चौकशी होवुन चौकशीअंती दखलपात्र गुन्हा घडल्याचे निष्पन्ण झाल्याने तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी *१) रुपेश कृष्णराव मारणे* , वय ३८ वर्ष, रा. नवएकता कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड, पुणे *२) उमेश प्रसाद वाफगावकर* , वय ४२ वर्ष रा. फ्लॅट नं.८. यशराज अपार्टमेंट सर्व्हे नं. १४/७ तपोधाम सोसायटी वारजे, पुणे *३) अनिल अंबादास लोळगे* , वय- ४० वर्ष, रा. १०५ गोल्डफिंच पेठ, नवी पेठ, जि. सोलापुर *४) नितीन तुकाराम ननावरे* , वय ४१ वर्ष, रा. ए-१ स्टार अल्टर सोसायटी, विन्डबिल व्हिलेज बावधन, पुणे यांचेविरुध्द बारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४२४ / २०२२. भा. दं.वि. कलम ३८६, ३८७, महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९.४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, *श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २. श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखा, पुणे, युनिट-4 चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहा. पो. निरीक्षक, चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक, श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, प्रविण काळभोर, संग्राम शिनगारे, सदोबा भोजराव, सचिन अहिवळे, सचिन गायकवाड, अमोल पिलाने, चेतन आपटे, सुरेंद्र साबळे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, आशा कोळेकर* यांनी केलेली आहे..

