✒️सांगली जिल्हा प्रतिनिधी
सांगली:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेच्या सांगली शहर अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळेस सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा संथापक अध्यक्ष उमरफारूक ककमरी, बांधकाम, श्रमिक व इतर सर्व कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय भूपाल कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष अनिल मोरे म्हणाले कि संपर्क कार्यालय सुरु करण्याचे करण की, कोणताही कामगार असो त्याची व्यथा आणि त्यास येणारे अडी-अडचणींना, काम करताना काही वेळेस मालक व कामगार यांच्या मध्ये समन्वय साधून समस्या दूर करण्यासाठी आम्ही या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून काम करणार असून कामगारांना बंधु व भंगिनिना थेट कोणतेही संवाद, सेवक संघटीत व असंघटीत आरोग्य कामगार संघटनेच्या संपर्क करण्यात सोईचे होण्यासाठी आम्ही हे कार्यालय सर्वांसाठी खुले करत आहोत.
सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम ह्यांच्या यांच्या नेतृत्वाखाली सुरु राहील असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष हरीश वाघमारे ह्यांनी कामगारांच्या हितासाठी व सोई साठी सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुका आणि शहरामध्ये जन संपर्क कार्यालये सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी सोबत संस्थापक सचिव फिरोज मोमीन, खजिनदार तौफिक मिरजकर, संचालक नईम मुश्रीफ, विज्ञान लोंढे, प्रथमेश बनसोडे, छाया ताई मोरे, बबन मोरे आदी मान्यवर उपस्थीत होते .
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
