युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि नागपूर मधील आमदार डॉ. नितीन राऊत हे राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रा सुरू असताना गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
राहुल गांधी सध्या तेलंगणात भारत जोडी यात्रा सुरू आहे. या दौऱ्यात राहुल गांधी दररोज वेगवेगळ्या समुदायातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेताहेत.
दरम्यान, भारत जोडो यात्रेत हैदराबाद इथं सहभागी झाले असताना माजी मंत्री नितीन राऊत यांना कुणाचा तरी धक्का लागला आणि तोल जाऊन ते खाली कोसळले. यामुळं त्यांचा डावा डोळा जखमी झाला असून, त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी होती. या गर्दीतून मार्ग काढत प्रत्येक जण पुढं जाण्याचा प्रयत्न करीत होते. अशाच प्रयत्नात कुणाचा तरी राऊत यांना धक्का लागला आणि ते खाली कोसळले होते.

