राजेन्द्र झाडे, चंद्रपुर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- काल गोंडपिपरी सह तालुक्यात अनेक ठिकाणी विजेच्या गर्जनेसह दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस आला शेतात काम करीत असताना अचानक विज कोसळल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना गोंडपिपरी – खराळपेट मार्गावरील शेतात दिनांक 29 शुक्रवारी दुपारी घडली यात विजेच्या धक्क्याने धनराज सूभाष निमगडे वय 55 रा चेकबोरगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले विजेच्या धक्क्याने मेंदुची नस फाटली असून मृतुसी झूंज सूरु आहे आणी ईकडे गावातील नागरिक धनराज लवकर बरे व्हावे म्हणून देवाकडे साकळे घालत आहे आणी एकीकडे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी धनराज ला नागपूर येथे रेफर केले आहे