योगेश दोडके पुणे शहर प्रतिनिधी
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे : कल्याणीनगर येरवडा परिसरात दि. १५/०७/२०२२ रोजी रात्री फिर्यादी हया मैत्रिणीसोबत मारीगोल्ड सोसायटीजवळून जात असताना दोन अनोळखी इसमांनी पाठीमागून येवून खांदयाला अडकवलेली पर्स व त्यागधील साहित्य जबरदस्तीने हिसकावून घेवून गेले त्याबाबत येरवडा पो स्टे गुर नं ३२५/२०२२ भादवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व पोलीस अमलदार किरण घुटे, तुषार खराडे व राहुल परदेशी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल हा आदित्य जाधव वापरत असल्याचे समजले. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरून कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व तपास पथकातील अंमलदार यांनी संशयीत इसम पळून जात असताना अतिशय शिताफीने त्यास पकडले.त्याला त्याचे नाव पत्ता विचारता अदित्य उर्फ बच्चू भारत जाधव वय २० रा बडगाव शेरी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे चौकशी करता त्याने त्याचा साथीदार नागे राज महेश कांबळे वय २१ रा लक्ष्मीनगर येरवडा पुणे याचेसोबत सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्याप्रमाणे दोघांना दि. ०१/११/२०२२ रोजी अटक करण्यात आली असून त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला २०,५००/- रु किं.चा गोबाईल, पर्स गुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांचकडे सखोल तपास करता त्यांनी येरवडा पो स्टे गुर नं. १६७/२०२२ भादवि ३७९.३७ व विमानतळ पो स्टे गु र नं १६६ / २०२२ भादवि ३७९ असे एकूण ३ गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्यांचेकडून ३ गुन्हे उघडकीस आलेले असून ७ मोबाईल, १ व्हेस्पा स्कुटर, १ हिरो डिलक्स मोटारसायकल असा एकूण ३,०९,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री रोहिदास पवार पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- ४ श्री किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. उत्तम चक्रे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफी प्रदिप सुर्वे, पो. अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, कैलास डुकरे, अमजद शेख, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओबासे यांनी केलेली आहे.

