चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी
चोपडा -तालुक्यातील चौगाव पासून जवळच अंतरावर असलेल्या सातपुड्यातील प्राचीन किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे यासाठी विविध मागण्यांचे निवेदन राजा शिवछत्रपती परिवार तसेच ‘ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या’ वतीने तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले. राजा शिवछत्रपती परिवार,तसेच ‘ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या’ च्या वतीने किल्ले व ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. गडपरिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन देखील करण्यात आले आहे. या ऐतिहासिक वारश्याचे संवर्धन करताना गडावर कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, गडाच्या पायथ्यापर्यंत रस्त्याची व्यवस्था व्हावी गड परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा अशा विविध मागण्यांचे निवेदन आज ‘ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष’ तथा स्थानिक इतिहासाचे अभ्यासक पंकज प्र शिंदे तसेच समितीचे सदस्य तथा चौगाव वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्राम तेले , आधार धनगर,विशाल पाटील आणि ग्रामस्थांनी तहसीलदार गावित यांच्याकडे सादर केले.