पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे : दिनांक ०५/११/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे अधिकारी व स्टाफ यांनी विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीतील स. नं. २५९ गट नं. १९/२/१ कलवड वस्ती, बौध्द विहार रोड, लोहगांव पुणे ३२ येथील एका ऑक्सीटोसीन या औषधाची अवैधपणे निर्मिती करणा-या कारखान्यावर छापा टाकून ५ इसमांना अटक करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचा मुख्य सुत्रधार *बाबुभाई ऊर्फ अल्लाउद्दीन* लस्कर रा. कल्याण ठाणे याचे व इतर ५ जणांविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण देंगळ अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत. सदर तपासामध्ये दाखल गुन्हयातील मुख्य सुत्रधार *बाबुभाई ऊर्फ अल्लाउद्दीन* लस्कर रा कल्याण ठाणे. हा मुंब्रा ठाणे येथे असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक *विनायक गायकवाड* अंमली पदार्थ विरोधी पथक १ यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच वरिष्ठांच्या परवानगीने तसेच सुचनेनुसार त्याचा शोध घेणे कामी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील अधिकारी व स्टाफ असे दि. ११/११/२०२२ रोजी मुंब्रा ठाणे येथे रवाना केले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील अधिकारी व स्टाफ असे सदर आरोपीचा मुंबा ठाणे या परिसरात शोध घेत असताना सदर आरोपीस अत्यंत शिताफीने मोतीमहल सोसायटी, अमृतनगर मुंब्रा ठाणे येथून ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर *श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सहआयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री. श्रीनिवास घाडगे, मा. राहा पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शन व सुचना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पो निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, महिला राहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, सचिन माळवे, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, राहुल जोशी, संदिप शिर्के.. रेहाना शेख, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते, नितेश जाधव* यांनी केली आहे.

