सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार मतदार यादीच्या विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम- 2023 अंतर्गत विद्यार्थी, महिला, दिव्यांग, घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीमधील व्यक्ती, तृतीय पंथीय व्यक्ती आणि देह विक्री करणाऱ्या महिला यांच्या मतदार नोंदणीकरीता विशेष शिबिरे आयोजित करण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये “तहसील कार्यालय बल्लारपूर” या कार्यालयास कळवले आहे.
या पत्रात दिलेल्या निर्देशानुसार: विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे दिनांक: 9 नोव्हेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासनाशी चर्चा करून कोणत्याही दोन दिवशी दोन शिबिरे आयोजित करण्यात यावीत. 2) दिनांक 12 नोव्हेंबर 2022 (शनिवार) आणि 13 नोव्हेंबर 2022 या दोन दिवसांमध्ये तालुक्यामध्ये महिला, दिव्यांग यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करावेत. 3) दिनांक 26 नोव्हेंबर 2022 (शनिवार) आणि दिनांक 27 नोव्हेंबर 2022 (रविवार) या दोन दिवसांमध्ये तालुक्यात तृतीय पंथीय व्यक्ति देहविक्री करणाऱ्या महिला आणि घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती यांच्या मतदार नोंदणीसाठी शिबिरे आयोजित करण्यात यावीत यावे. सदर शिबीर तहसील कार्यालय बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. असे डॉ. कांचन जगताप सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बल्लारपूर यांनी एका प्रेस नोट द्वारे कळविले आहे.