चोपडा प्रतिनिधी
चोपडा:- जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील भुमीअभिलेख कार्यालयातील अधिकार, कर्मचारी कामामधे करतात कामचोर पणा व गैरप्रकार त्यामुळे सामान्य नागरीक होतात त्रस्त असून त्यांचा मध्ये मोठ्या प्रमाणात असतोष दिसून येत आहे अशी माहिती बहुजन समाज पक्षाचे.विधानसभा अध्यक्ष सचिन बाविस्कर यांनी निवेदनातून दिली.
भुमीअभिलेख कार्यालय चोपडा जि. जळगाव यामधील अधिकारी, कर्मचारी, कामाचा बाबतींमध्ये कामचोर पणा/कर्तेवेहीन पणा करतात. कार्यालय मध्ये जर एखादा अर्ज जर एखादयाने सादर केला तर बावीस दिवसात तो अर्ज योग्य आहे किंवा नाही हे पाहुन त्या अर्जाची सुनावणी केली पाहीजे असे कार्यालयाचे काम आहे.परंतु ते न करता कार्यालय मधील अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात कामाची टाळाटाळ करतात. उदया या परवा या, पाहु नंतर करु, असे करत करत सहा महिने, बारा महिने, वर्षानुवर्ष फिरवतात. व नको ते गैर प्रकारचे काम करतात व सामान्य नागरीकांचे काम जे कायदेशीर आहे ते मात्र चोपडा भुमीअभिलेख कार्यालय मधील अधिकार व कर्मचारी करत नाही. अशा अनेक नागरिकांनी तक्रारअर्ज देखील केले आहे. तरी त्या अर्जांचा विचार देखील केला गेला नाही. कोणत्याही प्रकारची कार्यवाही अधिकारी व कर्मचारी यांचावर आजपर्यंत झाली नाही.
असेज जर यापुढे भुमिअभिलेख कार्यालय मध्ये कामचोर पध्दतीने कामकाज सुरु राहीले व गैरप्रकार पण सुरु राहीले तर बहुजन समाज पाटीॅ तफेॅ या विरोधात बंड केल्याशिवाय राहणार नाही. आसा इशारा बसपा विधानसभा अध्यक्ष सचिन बाविस्कर यांनी दिला आहे