अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मो. नं.-९८२२७२४१३६
सावनेर-३१ जुलै २०२२सावनेर तालुक्यातील केळवद येथील श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरात श्री.रामस्वामी महाराज यांची 18 वी पुण्यतिथी महोत्सवा ची सुरुवात २९ जुलै झाली असून ३१ जुलै ला समापन झाले.२९ जुलैला सकाळी ५ वा.संत सिताराम महाराज व हरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवानी गाडगे व पंकज गाडगे यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली.नंतर सामूहिक प्रार्थना ,हवन,गायत्री यज्ञ करण्यात आले.सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आटोपला.३० जुलैला सकाळी ८ वा. कपिलेश्वर मंदिरातून श्री संत राम स्वामी महाराज यांची पालखी भजन, दिंडी,ढोल-ताशाच्या गजराने सोहळ्याला सुरुवात झाली.महाराजांच्या पालखीचे संपूर्ण केळवद नगरीत भ्रमणकरीत असते.जागोजागी चहा, दूध, दही,फराळाचे स्टॉल लागले असतात.हजारोंच्या संख्येने भाविक महाराजांच्या पालखी सोहळ्यात उपस्थित राहतात.सा.७ वा.पासून ह.भ.प.प्रभाकर महाराज भुसारी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.३१ जुलैला सकाळी ११ वा.पासून गोपाल काल्याचे किर्तन ह. भ. प. लक्ष्मण दास काळे महाराज यांच्या हस्ते पार पडले.लगेच महाप्रसाद वितरित करण्यात आला.हजारोच्या संख्येने श्रद्धाळू उपस्थित होते.श्री.क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने भाविकांचे स्वागत केले.