राज शिर्के मुंबई प्रतिनिधी
मुंबई :- मुंबईच्या मालाड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेचे टीव्ही पाहाण्याचं वेड तिच्या जीवावर बेतलं. यात टीव्ही पाहताना झालेल्या हलगर्जीपणामुळे 27 वर्षीय रेखादेवी फुलकुमार निशाद नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. मृतक महिला टीव्ही पाहण्यात इतक्या मग्न झाल्या की त्यांनी उंदीर मारण्यासाठी ज्या टमाटरला विषारी औषध लावून ठेवलं होतं, तेच टमाटर तिने उचलुन खाल्लं.
प्राप्त माहितीनुसार, मृतक रेखादेवी फुलकुमार निशाद वय 27 वर्ष ही महिला मुंबईतील मालाड परिसरातील पास्कलवाडी, मारवेरोडे मालाड पश्चिम येथे आपल्या परीवारासह राहत होत्या. हिने उंदीर मारण्यासाठी तिने एक टमाटर ठेवलेले होते. मग ती टिव्ही बघण्यात गुंग झाली. काही वेळेनंतर तिने ते विषारी टमाटर उचलुन खाल्ल्य त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.