पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
अंमली पदार्थ विरोधी पथक पुणे शहर
पुणे :- दिनांक25 /11/2022 रोजी अमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील पो नि सुनिल थोपटे, व स्टाफ कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अमली पदार्थ गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माहिती काढण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना *पोलीस नाईक साहिल शेख व पो कॉ अझीम शेख* यांना बातमी मिळाली की, रिहान इलियास खान हा इसम काहीतरी अमली पदार्थ विक्री करिता भैरवनाथ मंदिर कोंढवा येथे येणार आहेत. मिळाले बातमी नुसार त्याबाबत सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून सदर बाबत छापा कारवाई करून संशयावरून पोलीस अंमलदार यांचे मदतीने सदर इसमांला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्याचे जवळ *9 ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ किंमत रुपये *180000 व 10000 कीं रु चे एक मोबाईल असा एकूण *190000/-* ऐवज मिळून आला आल्याने तो जप्त करून त्याचे विरुद्ध कोंढवा पोलीस ठाणे येथे N.D.P.S.Act ८(क) २०(ब) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही माननीय अप्पर पोलीस आयुक्त सो गुन्हे श्री रामनाथ पोकळे ,मा पो उप आयुक्त सो गुन्हे श्री अमोल झेंडे, मा सहा पो आयुक्त गुन्हे श्री नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे अधिकारी पो नि सुनील थोपटे, पो हवा संतोष देशपांडे , पो हवा. संदिप जाधव, , पो.ना. साहिल शेख,पो. शि. अझीम शेख, पो शि नितीन जगदाळे पो शि युवराज कांबळे, यांनी केली आहे.

