देवेंद्र शिरसाट हिंगणा तालुका प्रतिनिधी
हिंगणा:- समर्पित आयोगाच्या टक्केवारी नुसार रायपूर ग्रामपंचायत येथे नागरिकांचा मागासप्रवर्गा साठी चार जागा आरक्षित करण्यात याव्यात यासाठी रायपूर (हिंगणा ) येथील नागरिकांनी तहसीलदार हिंगणा यांना निवेदन दिले आणि आक्षेप नोंदवला १७ सदस्य संख्या असलेल्या रायपूर ग्रामपंचायत मध्ये १०० या सुत्रानुसार ४.५९ येवढ्या जागा आरक्षित होऊ शकतात परंतु सोडत काढत असताना नागरिकांचा मागासप्रवर्गा साठी फक्त तीन जागा आरक्षित केल्याने ओबीसी च्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तसेच त्यांनी आक्षेप घेत ओ बी सी करीता चार जागा आरक्षित कराव्यात अशी निवेदनाद्वारे मागणी केली.
निवेदन नायब तहसीलदार ज्योती भोसले यांनी स्विकारले या वेळी त्यांनी काही तांत्रिक बाबी नेवेदन कर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु निवेदन कर्त्यांच्या म्हण्या नूसार जेव्हा ४.५९ आरक्षण निघाले त्याअनुषंगाने ४ टक्के आरक्षण मिळणे अपेक्षित आहे करीता रायपूर ग्रामपंचायत मध्ये नागरीकांचा मागासप्रवर्ग साठी चार टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आले.निवेदन देते वेळी अनिल चानपुरकर,विक्की कैकाडे, पंकज गौर,तृशाल दुरबुडे, सुधाकर खंगार,भावेश कैकाडे, आकाश भोंडगे,विक्रमसिंग बावरी, सुहास कावळे, विशाल बांदरे, आदित्य मेंघरे इत्यादी नागरिक उपस्थित होते.