प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
हिंगणघाट :- तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शेकापुर बाई येथे २२ वर्षीय तरुनाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली असून मृत्यक तरुणाचे नाव दर्शन गोरख वय वर्षे २२ असे आहे.
सागर गोरख यांनी वडनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मृतक दर्शन गोरख वय 22 वर्ष हा वडीलांसोबत शेती करीत होता. त्याचे वडीलांनी मागील दोन ते तिन वर्षाअगोदर शेती गहान करुन बैंक ऑफ इंडीया शाखा वडनेर येथून कर्ज घेतले होते. परंतु मागील
तिन वर्षापासुन त्यांना शेतीत नापीकी झाल्याने व यावर्षीतर संपुर्ण शेती पुराचे पाण्यात बुडाल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज दर्शन व त्याचे वडील हे भरु शकले नाही. यामुळेच त्याचे मनावर परिणाम होवुन याने स्वताचे घरी गळफास घेवून आत्महत्या केली असावी. अशी तक्रार वडनेर पोलिस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी गुना दाखल केला असून पुढील तपास वडनेर पियस बागडे पोलिस करीत आहेत