शुभम ढवळे मालेगाव तालुका प्रतिनिधी
वाशिम दि.3 :- जिल्ह्यात आज 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत मागील 24 तासात सरासरी 0.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर 1 जून 2022 पासून आजपर्यंत जिल्ह्यात एकुण 494.7 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे.सर्वाधिक पाऊस मानोरा तालुक्यात 590.1 मिलीमीटर तर सर्वात कमी पाऊस कारंजा तालुक्यात 376.6 मिलीमिटर पडल्याची नोंद झाली.
आज 3 ऑगस्ट रोजी सकाळी गेल्या 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या 1 जून 2022 पासूनची आहे. वाशिम तालुका – 0.4 मिमी,( 478.1), रिसोड तालुका – निरंक (510., मालेगाव तालुका – निरंक (522.4), मंगरूळपीर तालुका – निरंक (520), मानोरा तालुका – निरंक (590.1) आणि कारंजा तालुका – निरंक (375.6) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी 3 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 552.4 मिमि पाऊस पडल्याची नोंद आहे.