दशरथ गायकवाड हवेली तालुका प्रतिनीधी
पुणे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्या मंदिर व विद्यालय, सह्योगनगर , रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे आज मंगळवार दिनांक ०६/१२/२०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले . यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री विठ्ठलराव गवळी, संस्थेचे सेक्रेटरी श्री निळकंठ लांडगे तसेच ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले . या प्रसंगी बालवर्ग , १ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेब यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली व इयत्ता २ री च्या विद्यार्थ्यानी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कविता देखील सादर केली त्यानंतर अध्यक्ष मा. श्री विठ्ठलराव गवळी यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. या महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन कार्यक्रमाचे श्रीम. आरती बोरुडे यांनी सूत्र संचालन केले व श्रीमती. मंगल नवले यांनी सर्वांचे आभार मानले .

