✒️सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन मिरज:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा पदाधिकारीचे मिरज शासकीय विश्रामगृहात 4 डिसेंबर रोजी बैठक संपन्न झाली सदर बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.उमरफारूक ककमरी हे उपस्थितीत होते.
तसेंच या बैठकीत सांगली जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबर संविधान दिना निमित्त आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व कामगारांचा मेळावा घेण्यात आला होता सदर मेळाव्याचा संपुर्ण आढावा व संघटनेचे भविष्यातील पुढील वाटचालीसाठी दिशा ठरविण्यात आली. त्याच बरोबर सचिन कांबळे यांचा संघटनेत स्वागत करून त्यांची शहर जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आले. व संघटनेचे ध्येय व उदिष्टे बाबत सविस्तर माहिती जिल्हा उपाध्यक्ष सागर आठवले यांनी दिले तसेच सेवक बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटना जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, शुभम चंदनशिवे, अनिस मोमीन, रोहन पुजारी, निलेश साळुंखे भैया पवार इ.. उपस्थित होते.

