सौ. हनिषा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
आशिष भाऊ देवतळे भाजपा युवा जिल्हा अध्यक्ष), मिथलेश भाऊ पांडे (भाजपा युवा जिल्हा महामंत्री), संदीप भाऊ पोडे (भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनात चेतनभाऊ पाल भाजपा युवा बाल्लरापूर विधानसभा सोशल मीडिया संयोजक यांनी विसापूर ग्रामपंचायतला निवेदना द्वारे केली मागणी.
गावात मोठ्या प्रमाणात डासाचे प्रमाण वाढले असून, सर्वत्र आजार पसरले आहे. फवारनी करन्याची मागणी. पावसाळा सुरु असून आपल्या विसापूर मध्ये सर्व वॉर्ड मध्ये डासांचे प्रमाण खूप वाढलेले आहे. आपण बघत आहात विसापूर मधील हास्पिटल मध्ये सुद्धा गर्दी वाढलेली आहे. आजरंचे प्रमाण देखील खूप झपाट्याने वाढत आहे. तरी हा विषय गंभीर आहे, आपल्या गावाचा विचार करत तात्काळ मछरांची फवारणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन चेतन पाल यांनी 24 जुलैला श्री. संदीप पोडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष यांनी दिले. ग्रामपंचायतनी फवारणी केले पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे.