पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
युनिट – ६ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- दिनांक ०६/१२/२०२२ रोजी लोणीकाळभोर पोस्टे गु.र.नं. ६२७ / २०२२ भा.द.वि. कलम ३०७, ५०४, ५०६ (२) १४३, १४७, १४८, १४९, ४२७ आर्म अॅक्ट ४/२५ म.पो.का. कलम ३७ (१) (३) १३५ क्रि.ला. अमेडमेन्ट ७ प्रमाणे दाखल गुन्ह्याचा संमातर तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट ६ कडील पो. अं. ऋषीकेश टिळेकर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, वर नमुद गुन्हयातील गुन्हयातील आरोपी शुभम पवार, अविनाश नाईकनवरे हे दोघे जयहरी हॉटेल येथे आलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
सदरची बातमी मा. रजनिश निर्मल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी बातमी प्रमाणे जाऊन खात्री करुन नमुद आरोपींना ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे आदेशीत केल्याने पोउपनि जायभाय, स्टाफसह खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन सापळा रचुन जयहरी हॉटेल मधुन दोन इसम बाहेर पडले असता मिळालेल्या बातमीतील इसम हे तेच असल्याची खात्री झाल्याने स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारता १) शुभम बापु भारती ऊर्फ पवार वय २१ वर्षे रा. वडकीनाला सासवड रोड पालखी मैदान ता. हवेली जि. पुणे २) अविनाश सुनिल नाईकनवरे वय २३ वर्षे रा. बडकीनाला मोरेवस्ती ता. हवेली जि. पुणे असे असल्याचे सांगितले.
नमुद गुन्हयाबाबत चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार रोहन इंगळे, ऋतिक कवठेकर, नन्या ऊर्फ अभिषेक हारगुडे, अनिकेत पालकर, एक विधीसंघर्षित बालक यांचेसह केल्याची कबुली दिली. त्याचेकडे गुन्हयातील इतर आरोपीबाबत माहिती घेत असतांना अनिकेत पालकर व विधीसंघर्षित बालक है जिओ मार्ट गोडवुन हांडेवाडी येथे आलेले असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्यांचे मदतीने अनिकेत पालकर व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्याचे नाव व पत्ता ३) अनिकेत राजु पालकर वय १९ वर्षे रा. पापडेवस्ती, भेकराईनगर फुरसुंगी ता. हवेली जि. पुणे ४) एक विधीसंघर्षित बालक असे असल्याचे सांगितले त्यांचकडे वर नमुद गुन्हयाबाबत चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे वर नमुद साथीदारसोबत केल्याची कबुली दिल्याने त्यांना दाखल गुन्हयाचे कामी ताब्यात घेवुन रिपोर्टसह पुढील कारवाई कामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे..
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रजनिश निर्मल, पोउनि सुरेश जायभाय, पोउनि भैरवनाथ शेळके, पोलीस अमलदार मच्छिंद्र बाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंळे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, अशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

