डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
पिंपरी-चिंचवड:- हवेत गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ०३ आरोपीच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार तासाच्या आत मुस्क्या आवळल्या आहेत. ही घटना मंगळवार (ता .६) रोजी सायंकाळी लिंकरोड चिंचवड येथिल जवळील पत्राशेड झोपडपट्टी येथे घडली होती. अचानक घडललेल्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आरोपी शाहरुख शाहनवाज शेख वय २९ वर्ष रा.गुलाबनगर दापोडी पुणे, शोएब नौसार अलवी वय २६ वर्ष,रा, माता सटवाई मंदिर शेजारी, पवार वस्ती दापोडी आणि फारुख शाहनवाज शेख रा, गुलाबनगर दापोडी पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगलवारी सायंकाळी चिंचवड लिंकरोड परिसरात एका रिक्षामधून आलेल्या तीन इसमानी हवेत गोळीबार केली असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या सर्व पथकाना घटना स्थळी भेट देवून आरोपीने तात्काळ अटक करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले होते.
आरोपी शाहरूख शेख आणि मोहम्मद अलवी हे दोघे मित्र आहेत. शाहरुख शेख याचा भाऊ इरफान शेख यांचे पूर्वीच्या गुन्ह्यांत नाव घेण्यांत आले होते या गोष्टीचा राग शाहरूख याला आलाहोता .तशी कल्पना त्यानें आरोपी मोहमद अलवी याला दिली होतीं. या कारणावरून मंगळवारी सायंकाळी हे रिक्षातून चिंचवड येथील लिंकरोड परिसरात फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणीआले माझ्या भावाचे नाव का गुन्ह्यांत घेतले असे शाहरूख शेख याने विचारणा केली तसेच शिवीगाळ करुन धमकी दिली. दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार करीत रिक्षातुन हे तिघेजण निघुन गेले.
पिंपरी चिंचवड आयुक्त अंकुश शिंदे ,अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील सहायक पोलीसआयुक्त पद्माकर घनवट, सहायक आयूक्त डॉ. प्रशांत अमुर्तकर यांच्या मार्गदर्शना खाली दरोडाविरोधी पथकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, उपनिरिक्षक मंगेश भांगे व अंमलदार युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर व अंमलदार युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदुरकर व अंमलदार युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड व अंमलदार गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने व पथकातील अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

