पंकेश जाधव पूणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट -०५, पुणे शहर
पुणे :- युनिट – ०५ गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार हे सायलेन्सर चोरीतील आरोपीचा शोध घेत असताना सायलेन्सर चोरीचे घटनास्थळी भेट देवुन माहीती काढीत असताना पोलीस अमंलदार यांना मिळालेल्या बातमीवरून इसम नामे विनय ललीत चव्हाण, वय २० वर्षे, रा. गजानन मंदिराजवळ, गजानन हाईटस, फुरसुंगी, पुणे यास व दोन विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्यांनी हडपसर भागात सायलेन्सर चोरुन त्यामधील धातुमिश्रीत माती ही ५०,०००/- रु प्रती किलो प्रमाणे कोटवा येथे राहणारा भंगार खरेदी विक्री करणारा तलहा आयुबअली मलीक, वय २४ वर्षे, रा. सागर कामठेनगर, कोंढवा पुणे यास विकल्याचे व तलहा मलीक याने ती माती पुढे शौकीन इतजार सलमानी वय ४५ वर्षे, रा. कुदळवाडी, चिखली, पुणे यास विकल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सुध्दा दाखल गुन्हयात अटक करणेत आलेली आहे. आरोपी याचेकडुन एकुण कि.रु. १,२०,०००/- रु किचे १० सायलेन्सर व ४०,०००/- रु किची धातुमिश्रीत माती व गुन्हे करणेसाठी वापरलेली ४५,०००/- रु किची हिरो स्प्लेंडर मोटर सायकल २,०५,०००/- रु कि.चा ऐवज जप्त करणेत आलेला आहे. असा एकूण आरोपी याचेकडुन एकुण १० सायलेन्सर चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, रमेश साबळे, विनोद शिवले, अकबर शेख, शशिकांत नाळे, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

