पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
पुणे :- लष्कर पो .स्टे. हद्दीत MG रोड, Fashion Street (F.S.) याठिकाणी विविध नामांकित ब्रॅंडच्या बनावट कपड्यांची चोरून विक्री होत असल्याची तक्रार वरिष्ठांना मिळाली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठांनी Unit-2 प्रभारी मा. क्रांतिकुमार पाटील सो. याना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे Unit-2 प्रभारी मा. क्रांतिकुमार पाटील सो. यांनी एक स्वतंत्र पथक तयार करून लष्कर पो.स्टे. हद्दीत MG रोड, Fashion Street (F.S.) याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर वरील पथकाने एकाचवेळी सर्व ठिकाणी छापा टाकून आरोपी विक्रेते (1) निसरुद्दीन शमशुद्दीन शेख वय 31 रा. कोंढवा (2) रिझवान इरशद कुरेशी वय 32 रा. कॅम्प (3) नोमान नजीर शेख वय 29 रा नाना पेठ (4) सय्यद राफे मकबूल अख्तर वय 32 रा भवानी पेठ (5) मुस्तक हसन कुरेशी वय- 30 रा कॅम्प यांना ताब्यात घेतले. छाप्यामध्ये त्यांचे ताब्यातून 2,80,000/-₹ किमतीचे नामांकित ब्रॅंडचे बनावट एकूण 222 नग T-शर्ट, 102 नग जॅकेट, 134 नग ट्रॅक पँट मिळून आल्याने ते पंचनाम्याने जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध RNA टेकनोलॉजी चे फिल्ड ऑफिसर श्री महेंद्र देवरा यांनी फिर्याद दिल्याने लष्कर पो स्टे CR No 161/22 कॉपीराईट ऍक्ट कलम 63, 65 अन्वये गुन्हा दाखल करून वरील आरोपीतांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कार्यवाही कामी लष्कर पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.
👉🏻 सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, Unit-2 प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली API विशाल मोहिते पो.अंमलदार. गजानन सोनुने, उज्वल मोकाशी, नागनाथ राख, मोहसीन शेख, निखिल जाधव, साधना ताम्हाणे या पथकाने केलेली आहे