भंडारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. साखरपुड्यासाठी बॅग खरेदी करणाऱ्यासाठी भावासोबत दुचाकीवर गेलेल्या सीआरपीएफ जवान असलेल्या बहिण आणि भावाचा समोरून येणाऱ्याने दुचाकीला कट मारल्याने दोघांचा ट्रकच्या चाकाखाली डोके चिरडून बहीण जागीच मृत्यू झाला तर भाऊ गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. किरण सुखदेव आगाशे वय 25 वर्ष असे मृत युवतीचे नाव आहे. लोकेश सुखदेव आगाशे वय 21 वर्ष, रा. निलज खुर्द, ता. मोहाडी असे जखमी भावाचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलावर ही घटना घडली.
मृतक किरण आगास ही मुंबई येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये कर्तव्यावर होती. ती आपल्या भावा बरोबर तुमसर येथे बॅग खरेदीसाठी आली होती. ती बॅग खरेदी करून दुचाकीने ते निलजकडे जात होते. देव्हाडी उड्डाणपुलावरून जाताना समोरून आलेल्या दुचाकीने कट मारल्याने दोघेही रस्त्यावर पडले. दरम्यान मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकखाली किरणचे डोके चिरडले गेले आणि ती जागीच ठार झाली. भाऊ लोकेश हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
किरण आगाशे ही सीआरपीएफमध्ये मुंबई येथे कार्यरत होती. तिचा विवाह ठरल्याने ती आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. दोन दिवसांनंतर तिचे साक्षगंध होते. या साक्षगंधासाठी बॅग खरेदी करण्यासाठी किरण आणि लोकेश तुमसर येथे गेले होते. घरी परत जाताना नियतीने घाला घातला आणि किरण अपघातात ठार झाली. या अपघाताची माहिती होताच आई व वडिलांनी एकच हंबरडा फोडला. घरात साक्षगंधासाठी असलेले आनंदाचे वातावरण एका क्षणात दुःखात बुडाले. पोलिस पुढील तपास करत आहे.

